भास प्रकाशन

रहस्य, शृंगार, भीती, साहस, विज्ञान, अद्भुत - सर्व प्रकारच्या मनोरंजक गोष्टींचे प्रकाशक.

अनियतकालिक

भास ११.२४

'भास ११.२४’ हा अनियतकालिकाचा पहिला अंक यंदा दिवाळीच्या सुमारास प्रकाशित करत असलो, तरी त्याचं भौतिक स्वरूप एखाद्या पुस्तकासारखं आहे. देखणं दर्शनी रूप; आयुष्य वाढावं अशा दृष्टीनं केलेली कागदाची, बांधणीची, आणि मांडणीची जाणीवपूर्वक निवड; आणि जाहिरातींचा पूर्ण अभाव असलेलं, रंजनाला प्राधान्य देणारं कथात्म-ललित-भाषांतरित साहित्याचं संकलन – असं याचं स्वरूप आहे. अंकातील काही गोष्टींची झलक.

आम्ही कोण म्हणुनी काय पुसता...

प्रश्नोत्तरे

आमच्याशी संपर्क कसा साधाल?
bhas.prakashan@gmail.com वर ईमेल लिहा किंवा 9920193183 वर WhatsApp मेसेज करा.
भास प्रकाशन कोणत्या प्रकारचं साहित्य प्रकाशित करतं?
भूतकथा, गूढकथा, नवलकथा, रहस्यकथा, अद्भुतिका, विज्ञानकथा, शृंगारकथा, चातुर्यकथा, तपासकथा या सगळ्या जॉन्रांमधलं उत्तम साहित्य आम्ही शोधत असतो. कथा, कादंबऱ्या, नाटकं, ललित निबंध हे सगळे साहित्यप्रकार आणि उत्तम कविताही. एखाद्या कलाकृतीतली मूळ कल्पना आवडली, की त्यावर संपादकीय संस्कार करण्याची आमची तयारी असते, किंबहुना या प्रक्रियेत आनंदाने सहभागी होणारे लेखक आम्हांला अपेक्षित आहेत.
तुमचं साहित्य आमच्याकडे कसं पाठवाल?
साहित्याचा नमुना आणि तुमचं संक्षिप्त परिचय bhas.prakashan@gmail.com या पत्त्यावर पाठवा.